Breaking News

धम्मगुरु भदंत सदानंद महाथेरो यांच्या निधनाने बौद्ध धम्म प्रसार चळवळीचा प्रज्ञावंत धम्मसूर्य हरपला : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


जगाच्या कल्याणासाठी युद्ध  नाही तर बुद्ध हवा या विचाराने जगभर बौद्ध धम्म प्रसारासाठी काम करणाऱ्या धम्मगुरुंमध्ये भदंत सदानंद महाथेरो  यांच्या निधनाने बौद्ध धम्म प्रसार चळवळीचा प्रज्ञावंत धम्मसूर्य  मावळला

मुंबई दि. 5 - अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक तथा अध्यक्ष महास्थविर सद्धम्मादित्य भदंत सदानंद महाथेरो यांच्या निधनामुळे बौद्ध धम्म प्रसार चळवळीचा प्रज्ञावंत धम्मसूर्य  मावळला आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीने  मार्गदर्शक गमावला असून  बौद्ध धम्म  चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले भदंत सदानंद महाथेरो यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. 

बौद्ध धम्म हा आदर्श जीवनमार्ग आहे मानव कल्याणासाठी बौद्ध धम्म आणि धम्माने दिलेली अहिंसा; शांती मंगलमैत्री; समता  आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या तत्वांचा मानवकल्याणा मानवी जीवनात महत्व आहे. जगाच्या कल्याणासाठी युद्ध  नाही तर बुद्ध हवा या विचाराने जगभर बौद्ध धम्म प्रसारासाठी काम करणाऱ्या धम्मगुरुंमध्ये भदंत सदानंद महाथेरो हे शिर्षस्थानी आणि भारतात राष्ट्रीय स्तरावर पूज्य बौद्ध भिक्खू  संघाचे अतुलनीय प्रज्ञेने नेतृत्व करित होते.

  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले
धम्मगुरु भदंत सदानंद महाथेरो निधनाने बौद्ध धम्म प्रसार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी मानवकल्याणाच्या विचाराने केलेले धम्मकार्य जगभर बौद्ध धम्म अनुयायांना प्रेरणा देत राहील अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शिकसंदेशात व्यक्त केली आहे. 
-------------------------

With the demise of Dhammaguru Bhadant Sadanand Mahathero, the wise Dhammasurya of the Buddhist Dhamma movement was lost - Union Minister of State Ramdas Athavale


 The demise of Bhadant Sadananda Mahathero, one of the Dhamma Gurus who worked for the propagation of Buddhism around the world with the idea that Buddha was not a war for the welfare of the world

Mumbai 5 - The demise of Mahasthavira Saddhammaditya Bhadant Sadananda Mahathero, the leader and president of the All India Bhikkhu Sangh, has brought down the wise Dhammasurya of the Buddhist Dhamma Prasar movement. His demise has left the Ambedkarite movement without a leader and the Buddhist Dhamma movement will never be remedied, said Republican National President and Union Minister of State for Social Justice. Ramdas Athavale pays homage to Bhadant Sadanand Mahathero.

Buddhist Dhamma is the ideal way of life for human welfare. Peace be upon you; The principles of equality and scientific approach are important in human life. Bhadant Sadananda Mahathero was one of the leading gurus who worked for the spread of Buddhism all over the world with the idea of ​​Buddha Hawa and not war for the welfare of the world.

 His demise has left a huge void in the Buddhist Dhamma movement. Ramdas Athavale has expressed his condolences that the Dhamma work done by him with the idea of ​​human welfare will continue to inspire the followers of Buddhist Dhamma all over the world.

No comments